गोरेगाव,दि.२१:-संचारबंदी व लाॅकडाऊन लागु असले तरी अनेक मजुर बाहेर गावाहून गावी जाण्यासाठी जात असतांना या १३० मजुरांना येथील जिल्हा परिषद शहीद जान्या तिम्या हाॅयस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राहण्याची व जेवणाची सोय करुन होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या केंद्रात असलेल्या मजुरांची शहानिशा व व्यवस्था पाहण्यासाठी आमदार विजय रहांगडाले यांनी मंगळवारी ( दि. २१) भेट दिली. यावेळी तहसीलदार एन एम वेदी, गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे, नगराध्यक्ष आशिष बारेवार,रेखलाल टेंभरे,मदन पटले,संजय बारेवार उपस्थित होते.
आमदार विजय रहांगडाले यांनी होम क्वारंटाइन केंद्रात असलेल्या मजुरांची विचारपूस करून आरोग्याविषयी माहिती विचारली असता एका व्यक्तीस पोटात वायू विकार असल्याचे सांगितले यावर तातडीने उपचार करावे असे वैद्यकीय अधिकारी यांना सांगितले. तहसीलदार वेदी यांनी तालुक्यातील साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व संनियंत्रण याविषयी माहिती दिली.नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सेवा भावी संस्था गरजु नागरिकांना जिवनाश्यक वस्तुचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती दिली. तालुक्यात कोरोना या साथरोगावर संनियंत्रण असल्याने आमदार विजय रहांगडाले यांनी समाधान व्यक्त केले पण काळजी घ्यावी असे आवाहन केले.





