अर्जुनी मोरगाव ,दि २२:तालुक्यातील ग्रामपंचायत देवगाव अंतर्गत देवलगाव व पंचवटी या दोन्ही गावांमध्ये सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समितीकडून हायपो क्लोराइड द्रावणाची फवारणी करण्यात आली. संपूर्ण देशामध्ये covid-19 रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे. सदर रोगाचा विषाणू चा प्रसार होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगावी,या करीता जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी देवगाव येथे सामाजिक सेवा समितीच्या माध्यमाने फवारणी केली. फवारणीच्या कार्याला गावकऱ्यांनी उत्कृष्ट मदत करून सरपंच तामदेव पाटील कापगते, उपसरपंच होमराज पुस्तोडे, सचीव कालीदास पुस्तोडे गावातील संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व को,आ, बँक संचालक केवलराम पुस्तोडे उपस्थित होते.सदर कार्याबाबत जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांचे गावकर यांनी आभार मानले.





