26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home शैक्षणिक स्वरा संग्रामे हिचे मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता परीक्षेत यश

स्वरा संग्रामे हिचे मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता परीक्षेत यश

0
209

सावळज,दि २२: मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० ची राज्यगुणवत्ता यादी मंथनच्या वेबसाईटवरुन प्रसिद्ध झाली. राज्यातील विविध केंद्रावरुन घेण्यात आली होती. सावळज शाळा नं.२ ने या वर्षी सुध्दा गुणवत्तेची परंपरा कायम ठेवलेली आहे.तासगाव तालुक्यातील सावळज शाळा नं.२ जिल्हा परिषद शाळेची इयत्ता दुसरीत शिकणारी कुमारी स्वरा सुधाकर संग्रामे हिने १५० पैकी १४० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये ६ वे स्थान प्राप्त केले आहे.

तिने तिच्या यशाचे श्रेय वर्गशिक्षिका वासंती पाटील मॅडम, हसबे मॅडम,आई ललिता ,वडील सुधाकर व याआधी शिकविणार्‍या शिक्षकांना दिले आहे. मुख्याध्यापिका बबुताई भोसले,केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे , प्रकाश कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मुलीचे अभिनंदन केले. विविध अधिकारी वर्गाकडून शिक्षकांकडून , मित्रमैत्रीणींकडून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.