26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ मुरपार येथे महिला बचत गटांनी केले मास्कचे वाटप

मुरपार येथे महिला बचत गटांनी केले मास्कचे वाटप

0
209

सडक अर्जुनी,दि.22ः- तालुक्यातील  ग्रामपंचायत मुरपार/लेंडेझरी येथे गावातील नागरिकांना कोरोना विषाणूंचा बचाव करण्यासाठी महिला बचत गटातर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.गावातील नागरिकांना मास्कचे वाटप संरपंच महेश केवट, ग्रामसेवक सुनील जी.सोनवाने,कौतुकाबाई रमेश कांबळे,वनिता विकास,प्रियंका सुशिल कांबळे,उषा मोरेश्वर इळपाते,पुजा विलास सयाम,सतिश मसराम, अश्विन सोनटक्केर यांनी केले. मास्कचे वाटप करतानी नागरिकांना काही सुचनांचे पालन करून कोरोना विषाणूचा बचाव करण्यासाठी घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या असे सांगितले.गावात बाहेर जिल्हा व राज्यांमधून ४६ लोक आले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे तपासणी साठी पाठवून त्यांचे घरी अलगिकरणात ठेवण्यात आले आहे.