मुंबई(वृ्त्तसंस्था)दि.22ः मुंबईतल्या धारावीत क्वारंटाइनची व्यवस्था कशी आहे त्याची पाहणी केंद्रीय आरोग्य पथकाने केली. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेही होते. त्यांनी धारावीतील क्वारंटाइनची व्यवस्था नेमकी कशी आहे ते स्पष्ट केले. आत्तापर्यंत धारावीत १८० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
देशातील करोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेतली तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. तसंच महाराष्ट्रातले सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. धारावी हा मुंबईतला हॉटस्पॉट आहे. या सगळ्या दरम्यान केंद्राचे पथक हे चार राज्यांमध्ये गेले आहे. चार राज्यांची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात येते आहे. आज मुंबईत केंद्रीय पथकाकडून धारावीत क्वारंटाइनची व्यवस्था काय आहे त्याची पाहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेही होते.
धारावीत एकूण ३७ कंटेंटमेंट झोन आहेत. त्यावरही प्रशासनाची नजर आहेत. आत्तापर्यंत धारावीत ६७५ टेस्ट करण्यात आल्या आहेत असंही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या केसेस वाढत आहेत त्याची कारणं आहेत ते जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक धारावी या ठिकाणी आले होते. फिव्हर कॅम्पची संकल्पना केंद्रीय पथकाला पटली आहे. जास्तीत जास्त टेस्ट करा आणि रुग्णांचं विलीगीकरण करा अशीही सूचना केंद्रीय पथकाने केली आहे.





