
भंडारा,दि.२२ :– कोरोनाच्या काळात दिव्यांग नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी व मदतीसाठी अपंग आयुक्तालयाने गुगल लिंक दिली असून आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील या लिंकवर नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी केली आहे.
कोरोना (कोवीड-19) संकट काळात महाराष्ट्रातील दिव्यांग नागरीकांना मदत करण्याकरीता अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून https://forms.gle/4UeZyEj3NaUToSKj9 अशा प्रकारे गुगल लिंक शेअर करण्यात आलेली आहे. सदर लिंकच्या माध्यमातून कोरोना (कोवीड-19) संकट काळात असलेल्या दिव्यांग व्यक्तीला हव्या असल्या मदतीबाबतचा तपशील त्यामुध्ये नमूद करण्यात येवून प्रशासनाकडून मदत प्राप्त करून घेता येईल. या करीता याद्वारे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती यांना तसेच दिव्यांग संस्था यांना आवाहन करण्यात येते की, संबंधीत लींकवर दिव्यांग व्यक्ती यांना आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील नोंदविण्यात यावा. जेणेकरून दिव्यांग व्यक्ती यांना स्थानीक प्रशासनाकडून तात्काळ मदत पुरविणे शक्य होईल.




