गोंदिया,दि.24ः– महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रय़त्न करत आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री सुरवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट प्रशासकीय कामाची माहिती देत आहेत.सोबतच जनतेलाही सहकार्य करण्यासाठी आवाहन करीत आहेत.सोबतच जिल्हास्तरावर या रोगावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशात काम सुरु असून जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना कोरोना संदर्भात माहिती देण्यासाठी अधिकृत नोडल अधिकारी जाहिर करण्यात आले आहे.पंरतु गोंदिया जिल्ह्यात गेल्या एक महिन्याचा विचार केल्यास जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रभार असलेले दोन अधिकारी बदलले असून 23 एप्रिल रोजी तिसरे अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रभार घेऊन बसलेत.जिल्ह्यातील रुग्णांचा विचार केल्यास 1 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर तो बरा होऊन घरी गेलेला आहे.तर बाहेर राज्यातून ,विदेशातून आलेल्यांवर उपचार करुन त्यांना शासकीय अलगीकरणात व होमक्वारटाईंन करुन त्यांच्यावर निगराणी ठेवले जात आहे.हे सर्व व्यवस्थित सुरु असतांनाच प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक असलेल्या श्रीमती डाॅ.पाटील यांनी तर चक्क प्रसारमाध्यमांना माहिती देण्यावर जिल्हाधिकारी यांनीच बंदी घातल्याचे सांगितले होते.त्यामुळे त्यांची उचलबांगडी त्या कारणावरुन झाली असावी असा अंदाज आहे.त्यांच्यानंतर डाॅ.संजिव दोडके यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रभार एक आठवड्यापुर्वीच देण्यात आला होता.पंरतु एका आठवड्यातच त्यांच्याकडून हा प्रभार काढून तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णलायाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.हिम्मत मेश्राम यांच्याकेड 23 एप्रिलरोजी देण्यात आला.डाॅ.दोडके यांच्याकडून प्रभार का काढण्यात आला कि त्यांनी स्वतः सोडले हे अद्यापही समोर आलेले नाही.मात्र डाॅ.दोडकेंच्या विरोधात बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत असलेले एक वैद्यकिय अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून विरोधात आहेत असे बोलले जात असले त्या अधिकार्यामुळे हटवणे हा कारण होऊ शकत नसला तरी जिल्हाप्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालयात कुठे तरी समन्वयचा अभावच कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता डाॅ.हिम्मत मेश्राम किती दिवस हा प्रभार कोरोना काळात टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात याकडे लक्ष लागले आहे.





