25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home मराठवाडा/खान्देश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना व्हायरस चाचणीला आयसीएमआरची मंजुरी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना व्हायरस चाचणीला आयसीएमआरची मंजुरी

0
183

नांदेड,दि.24. कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी मराठवाड्याला आता दुसरे टेस्टिंग सेंटर लाभले आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोव्हिड-19 टेस्टिंग सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून नांदेडच्या विद्यापीठात चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले यांनी शुक्रवारी दिली आहे. मराठवाड्यात नांदेड व्यतिरिक्त औरंगाबादमध्ये चाचणी करण्याची सुविधा आहे.

कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मराठवाड्यात आतापर्यंत केवळ औरंगाबादमध्येच चाचणी करण्याची सुविधा होती. औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हे टेस्टिंग सेंटर उभारण्यात आले होते. मराठवाड्यातील सर्व कोरोना संशयितांच्या चाचण्या याच ठिकाणी घेतल्या जात होत्या. आता नांदेडमध्ये सुद्धा विद्यापीठात टेस्ट केल्या जाऊ शकतील. नांदेडच्या विद्यापीठात असलेल्या लॅबमध्ये गुरुवारपासूनच चाचण्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये दररोज 500 चाचण्या घेण्याची क्षमता आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांनी दिली. दरम्यान, नांदेडमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्त सापडलेला परिसरात सध्या सील असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

blank