अर्जुनी-मोर,दि.24ः तालुक्यातील इटखेडा परिसरात वाघाची व अस्वलाची दहशत पसरल्याने परिसरातील जनतेतचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.23 एप्रिलच्या मध्यरात्री इटखेडा येथील अरुण गोपाळा पंधरे यांच्या अंगणात बांधलेल्या म्हशीच्या एका नऊ महिन्याच्या हल्यावर हल्ला करून त्याला ओढत बाजूला नेऊन बिबट्याने त्याचा फडशा पाडल्याने खळबळ माजली आहे.घटनेची माहीती मिळताच आज सकाळी वनविभागाचे कर्मचारी यांनी येऊन पंचनामा केला.अरुण याने नुकसानभरपाईची मागणी वन विभागाकडे केली आहे.





