24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ 55 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त;65 व्यक्ती अलगीकरण केंद्रात

55 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त;65 व्यक्ती अलगीकरण केंद्रात

0
582

गोंदिया दि.24 :कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 203 व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.आतापर्यंत 148 व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये 147 नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.1 नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

आज 24 एप्रिल रोजी 4 व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.एकूण 55 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.26 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या त्या युवकाचा 10 एप्रिल रोजी घशातील स्त्रावाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील हा एकमेव कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन आज 14 दिवस झाले आहे.या 14 दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील पाच अलगीकरण केंद्रात 65 व्यक्ती उपचार घेत आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल- 40,गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज -10, चांदोरी-12, लहीटोला – 1 आणि लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा -2 अशा एकूण 65 व्यक्तींचा समावेश आहे.

याशिवाय कोविड -19 संबंधित सल्ला हवा असल्यास हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधावा.आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.

blank