सडक अर्जुनी,दि.25 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर उपाययोजनांना सुरवात करण्यात आली आहे. गावाचे निजंर्तुकीकरण करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील,डव्वा,म्हसवानी,बोथली,परसोडी, घोटी (डव्वा),डोंगरगाव,कोहळीटोला येथे हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात आली. फवारणी करून संपूर्ण गाव निजंर्तुकीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टिन्स पाळणे, गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे आदि विविध उपाययोजना करण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. या कामात गावस्तरावर खबरदारी म्हणून ग्राम पंचायत प्रशासन पुढाकार घेत असून काळजी घेतली जात आहे. डव्वा येथे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या स्थानिक निधीतून हायपोक्लोराईड द्रावणाची फवारणी करून गाव निजंर्तुकीकरण करण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य किशोर तरोणे,खंडविकास अधिकारी निर्वाण,वैद्यकीय अधिकारी डाॅ.चांदेवार,राकेश जैन,रुपविलास कुरसुंगे,डाॅ.सोहन चौधरी,लिलेश रहागडले,शालींद्र कापगते, नाशिक बनसोड,श्यामभाऊ येवले,उमराव गहाणे,सरपंच दिनेश कोरे, ग्रामसेवक ओमेश कापगते, उपसरपंच एसकुमार बोरकर, पो.पा.लिलाधर कोरे, नेतराम ब्राम्हणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





