वर्धा,दि.26:जिल्ह्यातील अल्लीपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या खानगाव येथे आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास एका गर्भवती महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. खानगाव येथील रहिवासी असलेले महेश ठाकरे यांच्या शेतात मेंढपाळांचा मुक्काम होता. या मेंढपाळांच्या कळपात असलेली ही महिला असून तिचे नाव निर्मला सुमीत कुरवटकर (२४) असे आहे. तिने आपल्या दोन मुली राधिका (४) व काजल (३) या दोघींसह रविवारी सकाळी विहिरीत उडी घेतली. या निर्णयामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस तपास सुरू आहे.




