43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता ५७९४ वाहनचालकांकडून १२ लाखांचा दंड वसूल

५७९४ वाहनचालकांकडून १२ लाखांचा दंड वसूल

0
691

blank

गोंदिया,दि.27ःकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने २३ मार्च ते २३ एप्रिल या महिनाभराच्या काळात पाच हजार ७९४ वाहनचालकांना दंड आकारून त्यांच्याकडून १२ लाख २ हजार ६00 रुपए वसूल केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्च रोजी जनता कफ्यरू करण्यात आला. त्यानंतर २५ मार्चपासून केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊन मध्येही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणार्‍या अशा पाच हजार ७९४ लोकांना २३ मार्च ते २३ एप्रिल या काळात दंड ठोठावण्यात आला आहे. चारचाकी तसेच दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यावर पोलिस कारवाई करीत आहेत.
विशेष म्हणजे, लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलिस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून यात दुचाकी व चारचाकी अशा पाच हजार ७९४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत १२ लाख दोन हजार ६00 रुपए दंड वसूल करण्यात आला आहे. ह्यलॉकडाऊनचे पालन वहावे हा यामागचा एकमेव उद्देश आहे. रस्त्यावरून येणार्?या-जाणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्यावर पोलिस कारवाई करीत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाही. आणि कोरानाच्या प्रादुर्भाव रोखता येईल, हा या मागचा उद्देश आहे

blank