24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता बालाघाट जिल्ह्यातील टेमणी भागात नक्षल पोलिस चकमक

बालाघाट जिल्ह्यातील टेमणी भागात नक्षल पोलिस चकमक

0
471
file photo

गोंदिया,दि.29- शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील टेमणी पोलिस चौकी परिसरातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर पोलिस व नक्षल्यात चकमक झाली.या चकमकीत पोलिसांचा दबाव बघून नक्षल्यांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याची घटना  मंगळवारला सकाळच्या सुमारास घडल्याची माहिती बालाघाटचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी बेरार टाईम्शी बोलताना दिली. देवरबेली व टेमणी हॉक फोर्सची टिम सकाळच्या सुमारास सर्चिंगवर निघाली असता टेमनीजवळील टांडानदीपरिसरात दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी फायरिंग केली.यावेळी पोलिसांनीही लगेच अ‍ॅक्शन घेत फायरिंग सुरू केली,यामध्ये पोलिसांचा वाढता दबाव बघून नक्षली घटनास्थळावरून फरार झाले.याचकमकीत एका नक्षल्याला गोळी लागल्याचा अंदाज असून तपासादरम्यान एक बारोबोर असलेली भरमार बंदूक हाती लागली आहे.पोलिस व नक्षल्यामध्ये १०-१२ राउंड गोळीबार चालले असून पोलिसांनी सर्चिंग मोहीम सुरूच ठेवली आहे.२५-३०च्या संख्येत टांडा व दरेकसा दलमच्या नक्षल्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.