35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ बाराभाटी व देवलगावचे टाँवर सुरु करा ग्राहकांची मागणी : सात दिवसापासून बंद

बाराभाटी व देवलगावचे टाँवर सुरु करा ग्राहकांची मागणी : सात दिवसापासून बंद

0
273

अर्जुनी मोरगाव,दि.29 : वोडाफोन व जीओ कंपनीचे दोनही टाँवर सात दिवसापासून बंद पडल्याने या भागातील मोबाईल सेवा ठप्प पडल्याने ग्राहकांची अडचण निर्माण झाली असून टाँवर तात्काळ सुरु करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

या संबधाने ग्राहक सेवा देणारे अधिकारी यांच्याशी अनेकवेळा वार्तालाप केल्यावर ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देवून टाळाटाळ करत आहेत.तर बाराभाटी येथील वोडाफोनटाँवरच्या अनेकदा तक्रारी झाल्या परंतु टाँवरची काळजी व देखरेख करणारे अधिकारी हे त्याकडे दुर्लक्ष करुन बसले आहेत.त्याचप्रकारे देवलगाव(पंचवटी) येथील जीओ कंपनीचा टाँवर हा सुद्धा बंद करुन ठेवण्यात आला असून, ग्राहकांची चांगलीच अडचण या कंपनीवाल्यांनी केली आहे.सदर दोनही टाँवर बंद असल्यामूळे परिसरातील १०-१२ गावांत भ्रमणध्वनींचा नेटवर्क नाही नसल्याने संपर्क होत नाही व इंटरनेट सेवा ठप्प पडली आहे.सुहाश बोरकर, तेजस कांबळे, मयूर खोब्रागडे, प्रशिक बोरकर, सम्यक बोरकर, किर्तीकुमार खोब्रागडे, सुरेंद्र मेश्राम, मनमित कांबळे, मुन्नाभाई नंदागवळी आदी ग्राहक व येरंडी, देवलगाव, बाराभाटी, कुंभिटोला, सुकळी, खैरी, ब्राम्हणटोला, डोंगरगाव, कवठा, बोळदे, आदी गावांच्या परिसरातील ग्राहकांची मागणी आहे.

blank