25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ रब्बी पिकाचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. विनोद अग्रवाल

रब्बी पिकाचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. विनोद अग्रवाल

0
284
गोंदिया,दि.29ः-तालुक्यातील विविध गावात सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातून कालव्याच्या मार्फत सिंचनाची व्यवस्था केली जाते. पुजारीटोला पासून घेणाऱ्या मुख्य कालव्याला आमगाव तालुक्यातील बोरकन्हार गावाजवळ तळा गेल्याने गोंदिया तालुक्यातील विविध गावांत पाण्याचा पुरवठा खंडित झाला होता. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करता यावी म्हणून आमदार विनोद अग्रवाल यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तात्काळ कालव्याची दुरुस्ती करून खंडित झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू करावा यासाठी पाठपुरावा केला. कालवा दुरुस्ती होईपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील लोहारा, कन्हारटोला, गिरोला, पांढराबोडी व या परिसरातील इतर गावांना कालव्याच्या माध्यमाने पाणी न पोचल्याने रब्बी पीक पूर्णपणे जळाल्याची माहिती गावकऱ्यांनी आमदार अग्रवाल यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यावर आमदार अग्रवाल यांनी जाऊन चौकशी केली.यावेळी तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम, बाघ इटीयाडोह प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता घुमले इत्यादी अधिकारी सुद्धा गावांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते.हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात पाण्याअभावी रब्बी धानाचे पीक जळाल्याची माहिती यावेळी समोर आली. आमदार अग्रवाल यांनी बाघ इटियाडोह प्रकल्प विभागाच्या अभियंत्याला फोनवरून संबंधित पीक नुकसानीबद्दल माहिती देत तात्काळ या क्षेत्रापर्यंत पाणी कसे पुरवता येईल यासंबंधी व्यवस्था करण्याची सूचना  केली.