गडचिरोली,दि.29ः-दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या विदेशी नागरिकांनी विदेशी व्यक्ती अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात गडचिरोली पोलीस स्टेशन येथे कझाकीर्तान व किरगीजस्तान देशाच्या ०९ नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यापुर्वी त्यांना ०८ मार्च २०२० रोजी दिल्ली येथे भेट दिल्याकारणाने इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यांचा इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आल्याने व संबंधीत आरोपीतांनी त्यांना विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या व्हिजामधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना आज(दि.29)अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्यांना 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर चंद्रपूर येथील तुरुगांत रवानगी करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर सरकारी पंचासमक्ष आरोपीतांचे मोबाईल तसेच व्हिजाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
सदर या 9 व्यक्तीवंर अप.क्र. १२०/२०२० कलम १४ (ब) विदेशी व्यक्ती अर्थानयम १८८, २६९, २७० भादंवि, कलम ३,४, साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम २१ महाराष्ट्र कोविड- १९ अंमलबजावणी अधिनियम नियम क्रमांक ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. न्यायालयास आपला पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवत आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळावी यासाठी मागणी केली.संबंधीत आरोपींनी वकीलामार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केला.परंतु सरकारी वकील व तपासी अंमलदारांनी न्यायालयासमोर भक्कमपणे बाजु मांडत आरोपींनी विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या व्हिजातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आणुन देण्यात यशस्वी झाल्याने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.व संबधितांना न्यायालयाने १३ मे २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कायद्यातील तरतुदीनुसार तसेच मोबाईल व इतर बाबींचे तांत्रिक विश्लेषन झाल्यावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.




