गडचिरोली,दि.30: ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन (AIAEF), गडचिरोली यांच्यावतीने कोरोना बाधित लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रुपये 51 हजार, उपजिल्हाधिकारी(रोहयो) धनाजी पाटील यांच्याकडे जमा केले. यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे (AIAEF), अध्यक्ष भरत येरमे, कार्याध्यक्ष -माधवराव गावळ, सरचिटणीस सदानंद ताराम,कोषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुका अध्यक्ष,गडचिरोली अमरसिंह गेडाम, अध्यक्ष गो.गो.ब समिती गडचिरोली सुरेश किरंगे उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन (AIAEF), गडचिरोली मधील पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपाध्यक्ष श्रीमती सुनिता मरस्कोल्हे, प्रा. रमेश हलामी, सहसचिव वसंत पेंदराम, लालाजी उसेंडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. पितांबर कोडापे, जिल्हा संघटक लोकचंद बाळापूरे, कार्यकारिणी सदस्य वनिश्याम येरमे, शालिक उसेंडी, वासुदेव कोडापे, भास्कर आत्राम, दिनकर नरोटे, अनिल उईके, यशोधरा उसेंडी, वसंत पोरेटी, वत्सला नरोटे, सल्लागार गुलाबराव मडावी, फरेंद्र कुत्तीरकर, लक्ष्मणराव कोवे, रामचंद्र गोटा यांचा समावेश आहे. यावेळी प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी(रोहयो), धनाजी पाटील यांनी यावेळी त्यांचे आभार मानले.
निवृत्त तलाठी त्र्यबंकराव ठाकरे यांची अनमोल मदत आईकडून मिळालेला मदतीचा वसा मीही सुरू ठेवणार- ठाकरे
कोरोनामुळे अडकलेल्या गरजू लोकांना मदतीसाठी निवृत्त तलाठी त्र्यंबकराव ठाकरे यांनी प्रशासनाकडे ११,१,११ रूपयांची अनमोल मदत केली आहे. त्यांनी घेतलेला मदतीचा हा पुढाकार सर्वसामान्य लोकांपुढे आदर्श निर्माण करत आहे. मदतीबाबत सांगताना त्यांनी आपला ४० वर्षाच्या प्रशासनातील सेवेचा गडचिरोलीतील पाठ उलघडला. संपुर्ण सेवेमध्ये अतिशय दुर्गम आणि नक्षल प्रभावीत क्षेत्रात काम करून मला येथील त्या काळच्या जीवनमानाची जाणीव झाल्यानेच मी हा मदतीचा निर्णय घेतला असा ते म्हणाले. ही ११,१,११ रूपयांची मदत त्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी धानाजी पाटिल, जिल्हा माहिती अधिकारी, नायब तहसिलदार गौरीशंकर चव्हाण यांचे उपस्थितीत सुपूर्द केली. ते म्हणाले आईकडून त्या काळात गोरगरीबांना गरजुंना मदत करण्याबाबत शिकवण मिळाली. त्यामुळे अखंड नोकरीच्या कालावधीत मी जमेल तशी मदत करत राहिलो. जिल्हयाने मला खूप मोठी शिकवण दिली आहे. यातून मी माझ्या कुटुंबाला जोपासत आहे. आज मध्यमवर्गीय कुटुंबात राहत असलेले ठाकरे यांनी आपल्या मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभे केले. १९९७ ला निवृत्त झाल्यानंतर आजही ते प्रशासनाच्या कामाकाजाबाबत आवडीने वृत्तपत्रातून माहिती घेत आहेत. वृत्तपत्रातील विविध मदतीबाबतच्या बातम्या वाचूनच मला ही मदत करण्याची इच्छा झाली असे ते म्हणाले.प्रशासनाच्या वतीने यावेळी त्यांचे व उपस्थित मुलाचे आभार उपजिल्हाधिकारी धनाजी पाटिल यांनी मानले.
कोरोनाग्रस्तांसाठी 11 हजारांची मदत
गडचिरोली: नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, (नारी शक्ती) गडचिरोली यांच्यावतीने कोरोना बाधित लोकांसाठी जिल्हा सहायता निधीमध्ये रुपये 11 हजार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे जमा केले. यावेळी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन, (नारी शक्ती) गडचिरोलीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री येरमे, सल्लागार श्रीमती कुसूम अलाम, कार्याध्यक्ष श्रीमती रेखा तोडासे, सहसचिव श्रीमती लक्ष्मी कन्नाके हे उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी, दीपक सिंगला यांनी यावेळी त्यांचे आभार मानले.




