25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home रोजगार/व्यापार गुडगावातील त्या 500 मजुरांचा परतीचा प्रश्न कधी सुटणार

गुडगावातील त्या 500 मजुरांचा परतीचा प्रश्न कधी सुटणार

0
179

साकोली,(राकेश भाष्कर) दि.04ः-विदर्भातून रोजगारासाठी हरियाणातील गुडगाव हरियाणा येथे गेलेल्या 500 तरुणांनी आपल्या गावाकडे येण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे आर्त हाक लावली आहे.हरियाणातील गुडगाव येथे युवक अडकल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यालयात कळल्यावर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करुन परतीच्या प्रवासाचा मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले गेले.मात्र दोन तीन दिवसाचा काळ लोटूनही त्या युवकांना अद्यापही आपल्या गावाकडील मार्ग सापडलेला नाही.तर काहींनी परत संपर्क साधत आमच्याशी कुणीही संपर्क साधला नसल्याचे प्रतिनिधीला सांगितले आहे.एकीकडे शासन परराज्यातील मजुरांना युवकांना त्यांच्या राज्यात सोडण्याची तयारी करीत असताना विदर्भातील युवकांच्या समस्या मात्र कायम आहेत.

गुडगाव येथील मारुती सुझुकी कंपनी मध्ये काम करण्यासाठी विदर्भातील 500 च्या जवळपास युवक गेले होते,ते लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून कंपनीत जाणे बंद आहे.किरायांच्या खोलीत आम्ही असतो. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर काही दिवस आम्हाला रोजच्या प्रमाने सकाळ संध्याकाळचे जेवण मिळायचे, पण हे काही दिवसानंतर बंद करण्यात आले. कंपनीतून जेवण मिळायचे म्हणून आमच्या खोलीत स्वयंपाक करायच्या साधानांची आम्ही व्यवस्था केली नव्हती. अचानक जेवण बंद झाल्याने जेवण बनवायचे कसे हा मोठा प्रश्न झाला. कसेतरी बनवू लागलो, पूर्वी लॉकडाऊन मुले मिळालेल्या सुट्ट्या मजेत जाऊ लागले, पण किराणा, भाजीपाला, सर्पणाच्या व्यवस्थेकरिता ही मजा सजेसमान भासू लागली. एकदा आम्ही दोघे बाजारात भाजी आणायला गेलो असता आम्हाला परप्रांतीय असल्याने गावकऱ्यांनी हुसकावून लावले, पण करणार काय भाजीशिवाय काय खाणार, पुन्हा प्रयत्न केला ह्यावेळी मात्र विपरीत घडले आम्हावर दंडे पडले, एकाचा डोकाच फोडला गावकऱ्यांनी. कंपनीत कळविले कंपनी जिमदारी घ्यायला तयार नव्हती. आम्ही गुडगावात परप्रांतीय त्यामुळे आम्हाला हिणावले जाणे नेहमीचेच होते पण डोके फोडण्यापर्यंत आता प्रसंग आला होता. कंपनीने बिनकामाचा पगार देऊन आमची आर्थिक अडचण दूर केली खरी पण प्रश्न अन्नधान्याचा होता. तो काही सुटत नाही. लपून छपून खरेदी करावी लागते त्यात डोके फुटायची भीती असते. पगार मिळाला पण काम नसल्याने वेळ काही निघत नाही आम्हा सर्वांना आता नैराश्य आलेले आहे, कृपया आम्हाला आमच्या स्वगृही नेण्याची व्यवस्था करावी अशी व्यथा त्यांनी माडंली आहे.आमच्यापैकी काहींनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील आमदारांशी संपर्क साधला पण अजून काहीच झाले नसल्याचेही त्यांचे म्हणने आहे.
सदर बाब लक्षात घेऊन आमच्या प्रतिनिधीने साकोली क्षेत्रातील आमदार व विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेना ट्विट करून  500 मजुरांना स्वगृही आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.त्यानंतर तत्काळ पटोले तर्फे एक गूगल डॉकस तयार करण्यात आले व सोशल मिडियावर पसरविला गेला. ज्या कुणाला आपल्या स्वगृही जायचे असेल त्यांनी संबंधित फॉर्म भरण्याचे आवाहन केले गेले. ज्यांच्याकडे नेट आहे त्यांनी कदाचित हा फॉर्म भरला असेल पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचे काय हा प्रश्न आहे. पन काही का असेना नाना पटोलेनी ह्या मजुरांचा प्रश्न मार्गी लावावा व आमच्या मुलाला परत आणून द्यावे अशी मागणी पालकांनी केली आहे.