श्रीनगर(वृत्तसंस्था)दि.04ःहंदवाडाच्या काजीबाद परिसरात सोमवारी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सुरक्षादलाने या हल्ल्याचे प्रत्युतर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले, पण यादरम्यान 3 जवान शहीद झाले आहेत तर 7 जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर सीआरपीएफने परिसराला सील केले आहे. सध्या सर्वत्र सर्च ऑपरेशन सुरू आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बाहेरील नौगामच्या वागूरा परिसरात सीआयएसएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. यादरम्यान सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षादलाने या परिसराला सील केले आहे.





