27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गोंदिया प्रशासने पोचवले 87 कामगारांना बसव्दारे बालाघाट

गोंदिया प्रशासने पोचवले 87 कामगारांना बसव्दारे बालाघाट

0
1097

गोंदिया,दि.05ः कोविड-19 च्या संक्रमणाला थांबविण्याच्या उद्देशाने देशभर लाॅकडाऊन जाहिर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना ज्याठिकाणी होते तिथेच थांबावे लागले होते.या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील 87 कामगार हे गोंदिया जिल्ह्यातच अडकून पडले होते.त्या सर्वांना तिसर्या् टप्यातील लाॅकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संबधित राज्यात पोचविण्यास सुरवात करण्यात आली आहे.त्यांतर्गत आज 5 मे रोजी सकाळी येथील नेहरु चौकातून राज्यपरिवहन महामंडळाच्या 2 बसच्या माध्यमातून 87 फसलेल्या कामगारांना बालाघाट जिल्ह्यात 4 फेरीमध्ये सोडण्यात आले.यावेळी कामगारांना सोशल डिस्टसिंगचे महत्व सांगत बसण्याची सोय करण्यात आली होती.याबसला उपविभागीय अधिकारी संगिता सवरंगपते,गोंदिया नप मुख्याधिकारी चदंन पाटील, महसूल कर्मचारी व नप कर्मचारी उपस्थित होते.ज्या ज्या कामगार,विद्यार्थी व नोकरीतील नागरिकांनी प्रशासनाकडे संपर्क केले त्या सर्वांना संबधित ठिकाणी पोचविण्याची सोय प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे.