भंडारा,दि. 5 – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यास अनेक संस्था पुढे येत असून आज विविध संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचे 6 लाख 66 हजार 937 रुपयांचे धनादेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सुपूर्द केले.
राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्ह्यात दौरा असल्याने, ते भंडारा विश्राम गृह येथे आले असतांना, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सूनिल फुंडे यांच्या पूढाकाराने
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन 4 लाख 58 हजार 495 रुपये, मजूर सहकारी संस्था भंडारा 1 लाख 11 हजार 111 रुपये, मच्छिमार सहकारी संस्था 91 हजार 777 रुपये व कबीर पंथिय 5 हजार 555 रुपयांचे धनादेश आज सुपूर्द करण्यात आले. संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधीला जास्तीत जास्त मदत निधी द्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, कैलास नशीने , सागर गणविर, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे सर व्यवस्थाक संजय बूरडे,अजय मोहनकर, सदाशिव वलथरे, सुनिल शिवरकर, वासूदेव तिरमारे चर्तुरभूज भानारकर, अभिजीत वंजारी, विलास घाटबांधे, शैलेंद्र सतदेवे, गंगाधर रिनके, धनराज चौधरी, बाबूराव बारबत्ते, राकेश मलेवार, मिलिंद राहुल,फिरोज मुंडले,भिवा पारधी,ज्योती ब्राम्हणकर, रिना नागपूरे,नरेंद्र बूरडे आदी उपस्थित होते.





