27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ दुर्गमध्ये पाॅझिटिव्ह निघालेल्या युवकाच्या कुटुंबियाचे रिपोर्ट निगेटिव्ह

दुर्गमध्ये पाॅझिटिव्ह निघालेल्या युवकाच्या कुटुंबियाचे रिपोर्ट निगेटिव्ह

0
2230

गोंदिया,दि.06ः. जिल्ह्यातील गर्रा निवासी असलेला युवक हा छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या नात्यातील व संपर्कात आलेल्या ३२ जणांना शासकीय अलगीकरण केंद्र असलेल्या जिल्हा क्रिडा संकुलात ठेवण्यात आले आहे.दरम्यान त्या युवकाच्या आईवडील व बहिणींसह नातेवाईंकाचे नमुणे नागपूर शासकीय वैद्यकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्या पाठविलेल्या नमुन्यापैकी त्या युवकाच्या आईवडिलासह बहिणीचे व इतरांचे नमुणे निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.गेल्या 26 दिवसापासून जिल्हाप्रशासन,पोलीस,आरोग्य विभाग व इतर विभाग जिल्हा कोरोनामुक्त रहावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्यामुळेच ग्रीन झोनमध्ये येऊ शकला.परंतु दुर्ग येथे गोंदियातील युवक पाॅझिटिव्ह आढळल्याने मात्र जिल्हा प्रशासनाला अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे.

सावधगिरीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात येणाèया नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.काही व्यक्तींना घरीच तर काहींना शासकीय संस्थांमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.तालुक्यातील गर्रा येथील ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे व तालुका वैद्कीय अधिकारी डाॅ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या नेतृत्वातील आरोग्य विभागाच्या पथकाने त्या गावात आवश्यक त्या निर्देशानुसार तपासणी मोहिम सुरु करीत नजर रोखून ठेवली आहे.सदर युवक हा लाॅकडाऊनच्या काळात गोंदियावरुन दुर्गला पोचला.त्यानंतर तिथे काम करीत असलेल्या कंपनीत रुजु होण्यासाठी गेला असता परराज्यातून आल्याने कंपनीने त्याला रुजु करण्याएैवजी आधी रुग्णालयात तपासणीकरीता पाठविले.रुग्णालयात तपासणीदरम्यान वैद्यकीय चमूला लक्षण आढळल्याने त्याचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते.तो अहवाल 4 मे रोजी पाॅझिटिव्ह आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने पोलिस ठाण्याला माहिती दिली.त्यानंतर तेथील पोलिस विभागाने गोंदिया पोलिसांना व जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्या युवकाच्या कुटुबियांसह गावात संपर्कात आलेल्यांना शासकीय अलगीकरण केंद्रात हलविण्यात आले होते.