
नागपूर,दि.06 ः – अन्न व औषधी प्रशासन विभागाने गुप्त माहितीवरून नागपूरातील कळमना हद्दीतील स्मॉल एरिया परिसरातील एका कारखान्यावर धाड टाकली असता येथे खाण्या योग्य नसलेल्या 13 लाख 9 हजार 500 रुपये किंमत असल्याचा सुपारीचा साठा आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त चंद्रकांत पवरा यांच्या नेतृत्वाखाली शहरात विशेष मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत कळमना हद्दीतील स्मॉल एरियातील प्लॅट नं. 209 व 210 येथे धाडीची कारवाई करण्यात आली. दरम्यान सुपारी कारखान्याचा मालक पळून गेला. अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड यांच्या हातून कारखाना मालक पळून गेला तर कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी कारखान्याचे कुलूप तोडून पंचासमक्ष पंचनामा करून 4365 किलो सडकी सुपारी जप्त रकण्यात आली. तसेच कारखान्याला सीलही ठोकण्यात आले.





