गोंदिया,दि.06 कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी असलेल्या संचारबंदीमूळे अनेक नागरिकांना जिथे आहेत तिथेच राहण्याची सुचना करण्यात आल्यानंतर अनेक नागरिक अकडले होते.आता सरकारने तिसर्या टप्यातील लाॅकडाऊन दरम्यान परराज्यातील लोकांना,विद्यार्थ्यांना व पर्यटकांना जाण्यास परवानगी देण्यात आली.त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात जे नागरिक थांबले आहेत,त्यांना वैद्यकिय प्रमाणपत्र जाण्यापुर्वी तपासणी करुन मिळावे यासाठी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयाने खासगी व शासकीय वैद्यकिय अधिकारी यांचे 5 पथक तयार करुन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
याठिकाणी अडकलेल्या नागरिकांनी आपली तपासणी करुन प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले आहे.जे केंद्र तयार करण्यात आले.
त्यामध्ये नवीन प्रशासकीय ईमारत, जयस्तंभ चौक य़ेथे नायब तहसिलदार सचिन पाटिल यांना नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले असून डॉ. प्रणीता चिटनीस, डॉ चन्द्रशेखर राणा, डॉ राकेश गुप्ता, डॉ संजय माहूले,तहसिल कार्यालयाचे अधिक्षक आनंद बोरकर हे सहकार्य करणार आहेत.
दुसरे केंद्र कृषि उत्पन्न बाजार समिति गोंदिया य़ेथे असून याठिकाणी डाॅ.संदीप कोठारी, डॉ.गौरव अग्रवाल,डॉ.तृप्ति कटरे, डॉ.नॉविल ब्राह्मणकर, रोहित जड़गांवकर नेटवर्क इंजीनियर.तिसरे केंद्र होम्योपैथीक महाविद्यालय, पाल चौक येथील सबंधित डॉक्टर तसेच तहसिल कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक भारत धारने हे नियंत्रणासाठी असतील.चौथे नगर परिषद गोंदिया येथे डॉ.पीयूष जायसवाल,डॉ.विनोद मोहबे,डॉ.ओमप्रकाश गुप्ता,डॉ. उमेश शर्मा व नियंत्रणासाठी तहसिल कार्यालायचे लिपिक मधुकर दोनोडे यांची नेमणुक करण्यात आली आहे.पाचवे केंद्र हे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.याशिवाय ज्याठिकाणी नोंदणीकृत एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस व अन्य डॉक्टर उपलब्ध आहेत,त्याठिकाणीही आपली आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहनही उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी काढलेल्या आदेशात केले आहे.




