34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता एलईडी चोरटे पोलिसांच्या ताब्यात

एलईडी चोरटे पोलिसांच्या ताब्यात

0
276

blank

गोंदिया,दि.06ः गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणेंतर्गत येत असलेल्या आसोली व किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एलईडीसंच चोरीला गेल्याची घटना 8 फेबुवारी 2020 रोजी घडली होती.याप्रकरणाची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.चोरट्यांनी 40 इंची स्मार्ट आयवा कंपनीचे 3 एलईडी टीव्ही 54 हजार रुपयाचे (प्रत्येक टीव्ही 18000 रु.) चोरी केली होती.याप्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज 6 मे रोजी आसोली येथे सापळा रचून गावातीलच तीन युवकांना ताब्यात घेतले.त्या युवकाकंडून विचारपुस केल्यानंतर त्यांनी चोरीचा गुन्हा मान्य केला.त्यामध्ये रितेश अनिल रामटेके (वय 20),रूपेश अनिल रामटेके( वय 23)व राज रविन्द्र गनवीर(वय 17)सर्व राहणार आसोली यांचा समावेश आहे.यांच्याकडून चोरी गेलेले तीन्ही एलईडी संच हस्तगत करण्यात आले.ही कारवाई पोलिस अधिक्षक मंगशे शिंदे,अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे यांच्या चमूसह सहायक पोलिस निरिक्षक दिलीप कुंदोजवार,सहाय्यक फौजदार रामलाल सार्वे,पोलिस नायक सुधीर भालाधरे,खेमराज बोधनकर,अम्बरवाडे,ज्योति बांगरे यांनी केली.

blank