34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीचा १६ वा स्थापना दिवस

राष्ट्रवादीचा १६ वा स्थापना दिवस

0
33

blank

गोंदिया दि.१३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आ.राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवनात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. जैन यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले की, येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकजुटतेच्या शक्तीचे प्रदर्शन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे.
सभेत देवेंद्रनाथ चौबे, चुन्नी बेंद्रे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशिवार, कुंदन कटारे, नरेंद्र तुरकर, बाळकृष्ण पटले, खालीद पठान, नरू हालानी, सुशीला भालेराव, ललिता चौरागडे, रमेश गौतम, केवल बघेले, डुमेश चौरागडे, बाळा हलमारे, रामू चुटे, जीवन लंजे, पुरण उके, विष्णू शर्मा, केतन तुरकर, मोहन पटले, रवी मुंदडा, दीपक कनोजे, अनिता तुरकर, डॉ. खान, डॉ. विनोद पटले, अशोक डोंगरे, गनाजी चव्हाण, वामन गेडाम, पी.एस. फुले, मिताराम नेवारे, पटले गुरूजी, पंकज पटले, सोनू येडे, भरत टेकाम, लखन बहेलिया, शंकर चनाब, रंजीत वैद्य उपस्थित होते. आभार अशोक शहारे यांनी मानले.

blank