जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत ल.पा. तलावाची दुरुस्ती

0
17

गोंदिया दि.१३: आमगाव जि.प. लघू पाटबंधारे विभागातर्फे परिसरातील धामनगाव येथे जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत ल.पा. तलावाची दुरुस्ती करण्यात येत आहे.कालीमाटी जवळील दोन कि.मी. अंतरावरील धामनगाव येथे पाटबंधारे तलाव, कालावे दुरुस्तीचे उपक्रम हाती घेण्यात आले. या कार्यासाठी तीन लाख ९0 हजार रुपये निधी शासनाने मंजूर केला. देवरी तालुक्यात पद्मपूर येथे सुरक्षाभिंत, एक नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. तसेच सडक-अर्जुनी तालुक्यातील कोपीटोला येथे नाला खोलीकरण, साठवण बंधारा यासाठी ८६ हजार आणि एक लाख रुपये मंजूर आहे. फुक्कीमेटा साठवण बंधारा व नाला खोलीकरणासाठी एक लाख ५0 हजार निधीतून कामे पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत राज्य दुष्काळमुक्त करणे, नागरिकांना पिण्यासाठी, गुर्‍हांसाठी व शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने जुन्या बंधार्‍यांना, कालव्यांची आणि नाल्याची दुरुस्ती करुन पावसाळ्यातील पाण्याची साठवण उत्तमरीत्या केले जाईल, अशी प्रतिक्रिया लघुपाटबंधारे विभागातील अभियंता पी.बी. शाहू यांनी दिली. तसेच पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे व भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे असे अनेक उद्देश्य आहेत.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत उपस्थिती गोषवारानुसार ल.पा.त.वाघडोंगरी दुरुस्तीसाठी मजूर संख्या १४३, सा.व. करंजी ५७, ल.पा.त. नहर दुरुस्ती गोरठा ४६, ल.पा.त.वि. दुरुस्ती खुश्रीपार, अंजोरा, ठाणाटोला, सानेखारी, सुरकुडा, सितेपार, कवळी, खुश्रीपारटोला, मुंडीपार, जामखारी, शिवणी, धामनगाव, बघेडा, चिमनटोला, गोसाईटोला, जवरी, किकरीपार येथे विविध कामे सुरू आहेत. रोहयो कामात एक हजार ९७५ मजूर कामे करीत असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली आहे.