24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता बरबसपुरा-अंभोरा हत्याकांडात मृतकाच्या पत्नीसह प्रेमी व अन्य एकास अटक

बरबसपुरा-अंभोरा हत्याकांडात मृतकाच्या पत्नीसह प्रेमी व अन्य एकास अटक

0
562
गोंदिया,दि.08ः गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत 7 मे रोजी  बरबसपूरा- अंभोरा मार्गावरील नहराच्या पुलाखाली एका युवकाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरवात केली.अवघ्या 24 तासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध लावत त्यांना जेरबंद केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर सुरक्षेचा अधिक ताण असतानाच अशा घटनांमुळे अधिकच ताण वाढतो,त्यातच या घटनेमुळे पोलीस अधिक्षकांनी वेळ वाया न घालविता तीन पथक तयार करुन चौकशीचे आदेश दिले.त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा,उपविभागीय पोलीस अधिकारी व ग्रामीण पोलीसांचे पथक आपपल्या पातळीवर तपासाच्या कामी लागत या हत्याकांडाची गुत्थी सोडविण्याच्या कामाला लागली.मृतक मूलचंद गोमाजी शहारे (वय 34) हा जवळील कारंजा येथील असून गेल्या 4 महिन्यापासून तो पत्नीसोबत टेमनी येथील सासुरवाडीत रहायला गेलेला होता.तपासादरम्यान पोलिसांना मृतकच्या पत्नीवर शंका आल्याने तपास सुरु केला असता गावातीलच एका 45 वर्षीय व्यक्तीसोबत अनैतिक संबध असल्याचे समोर आले.मृतक हा दारु प्राशन करुन पत्नीला मारहाण करीत असल्याचे मृतकच्या पत्नीने गावातील प्रेमी सुरेश नागरिकरला सांगत त्याची जिवनलिला संपविण्याचा डाव एक महिन्यापुर्वीच रचला होता.घटनेच्या दिवशी 6 मे रोजी मृतक मुलचंदला आरोपी सुरेश व त्याचा सहकारी धर्मेंद सुधाकर मारबते यांनी दारु पिण्याच्या बहाण्याने घटनास्थळावर घेऊन गेले.त्यानंतर त्याच्या गळा व डोक्यावर कुर्हाडीने वार करुन हत्या केली.पोलिसांनी महेंद्र ज्ञानीराम शहारे यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द कलम 302, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर करुन 15 मे पर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पुलीस निरीक्षक रमेश गर्जे, गोंदिया ग्रामीण ठाण्याचे सपोनि अभिजीत भुजबल, सपोनि प्रदीप अतुलकर, पोलीस कर्मचारी लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत कर्पे, पुलिस उप निरीक्षक उमेश गुटाळ, रोहीत भोर, बापु मुंढे, पुलीस कर्मचारी पटले, गुरमुले, बिसेन, चकोले, कटरे, महिला पुलीस तांडेकर चालक लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चे सपोनि दिलीप कुंदोजवार, रामलाल सार्वे, बोधनकर, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलीस कर्मचारी दिक्षीतकुमार दमाहे, थनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केली.