गडचिरोली,दि. 08 : शहरातील आशीर्वाद नगरामध्ये जुगारचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशीर्वाद नगरामध्ये आशीर्वाद नगरातील प्रविण प्रमोद रक्षणवार याच्या घरी धाड टाकून त्याच्यासह ११ जुगाऱ्यांना 7 मे रोजी रंगेहाथ पकडले.या प्रकरणी पोलिसांनी जवळपास ५ लाख ३२ हजार ७३५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सुभाष समय्या उप्पलवार (२७), मिथून महेंद्र रणदिवे (३६), अमित प्रदिप इंदूरकर (२८), योगेश महेंद्र रणदिवे (३२), प्रविण प्रमोद रक्षणवार(३२), विजय ज्ञानेश्वर वागुलकर (३०) सर्व रा. आशीर्वाद नगर गडचिरोली, (३३), कॅम्प एरिया गडचिरोली, अथर्व लक्ष्मण कासर्लावार (२५) कॅम्प एरिया गडचिरोली, दिनेश नामदेव भगत (४५) आयटीआय चौक गडचिरोली, कपिल गजानन चावके (३२) बसेरा कॉलनी, जगदीश रामचंद्र डोंबळे (३०) महिला महाविद्यालया मागे गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.पोलीसांनी घटनास्थळावरून जुगाराचे डावावर लावलेली १६ हजार २१ रूपये रोख रक्कम तसेच ११ इसमाकडे जुगाराच्या डावात वापरण्यासाठी ठेवलेली १ लाख २९ हजार ५०० रूपयाची रोख रक्कम, १ लाख ६० हजार किमतीच्या चार दुचाकी, २ लाख २७ हजार किमतीचे १२ मोबाईल, ११५ रूपये किमतीचे साहित्य असा ५ लाख ३२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरूद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





