37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय लाखांदूर तालुक्यात निराधार,दिव्यांग,विधवा,गरजूंना राँकातर्फे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

लाखांदूर तालुक्यात निराधार,दिव्यांग,विधवा,गरजूंना राँकातर्फे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
95

blank

लाखांदूर,दि.09 :कोविड १९ लॉकडाऊन मध्ये तालुक्यातील निराधार अपंग विधवा व गरजूंना उपासमारीच्या संकटावर मात करण्या हेतू लाखांदुर तालुका राँकॉपदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत येथील तहसिलदारांना जिवनावश्यक वस्तुंसह रोख रक्कम सुपुर्द करीत तालुक्यातील गरजुंना थेट वाटप करण्यासबंधाने निवेदन दिले आहे.तहसिलदार संतोष महल्ले यांना जिवनावश्यक वस्तुंसह रोख २७००० रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला.लॉकडाऊनमुळे लाखांदुर तालुक्यात अनेक गोरगरीब,निराधार,अंध,अपंग व गरजु कुटुंबांवर ऊपासमारीचे संकट येऊ नये या हेतुने राज्य अथवा केंद्र शासनाच्या सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी थेट तालुक्यातील जनतेला येथील तहसिलदारांमार्फत मदतीचा अभिनव ऊपक्रम येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राबविला आहे.
सदर ऊपक्रमानुसार तालुका राॅंकाच्या वतीने येथील तहसिलदारांमार्फत तालुक्यातील निराधार, अपंग , विधवा व गरजुंना जिवनावश्यक किट अंतर्गत तांदुळ , बेसन , सोयाबिन वळी , बिस्कीट यांसह रोख रकमेतुन आवश्यकता पडल्यास अधिक साहित्य खरेदी करुन वाटप केले जाणार आहे.यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बालु चुन्ने,तारायुकॉ अध्यक्ष अँड मोहन राऊत , कृऊबास ऊपसभापती देविदास राऊत, रेशीम परशुरामकर , सुभाष दिवठे , धनराज हटवार , राकेश राऊत , अतुल परशुरामकर , कल्पना जाधव , गिता लंजे , सुनिता बिसेन यांसह अन्य पदाधिकारी ऊपस्थित होते.

blank