25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ पाणी टंचाई उपाययोजना 12 नविन विंधन विहिरींना मान्यता

पाणी टंचाई उपाययोजना 12 नविन विंधन विहिरींना मान्यता

0
134

गोंदिया दि.९ : जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुक्यातील 12 गावे/वाड्यामध्ये एकूण 12 नविन विंधन विहिरींच्या कामांना जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता दिली आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील दल्ली येथे फागु मडावी यांच्या घराजवळ, शेंडा येथे धनलाल कुंजाम यांच्या घराजवळ, गोंगले येथे उमेंद्र केवट यांच्या घराजवळ, पांढरी येथे सुरेश कोटांगले यांच्या घराजवळ, कोसमतोंडी येथे जगनाडे चौक सभामंडप जवळ, मुंडीपार/ई. येथे निमराव कवर यांच्या घराजवळ, खोडशिवनी येथे माधोराव शिवणकर यांच्या घराजवळ, म्हसवानी येथे योगीराज सराले यांच्या घराजवळ, बोथली येथे गजानन भोयर यांच्या घराजवळ, घाटबोरी/ते. ज्ञानीराम झिंगरे यांच्या घराजवळ, बौध्दनगर येथे बुध्द विहार जवळ, केसलवाडा/कोदामेंढी येथे भानुदास चुटे यांच्या घराजवळ. अशा एकूण बारा ठिकाणी 13 लक्ष 18 हजार 392 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.