27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय खा. मेंढेंच्या पुढाकारातून त्या ३१ मजुरांना गाठता येणार स्वगाव

खा. मेंढेंच्या पुढाकारातून त्या ३१ मजुरांना गाठता येणार स्वगाव

0
207

भंडारा,दि.10ः-स्वगृही परतण्याची मुभा मिळाल्याने आता प्रत्येकालाच आपले घर जवळ करण्याची घाई झाली आहे. शक्य त्यांच्या मदतीने गाव गाठण्यासाठी धडपडत असलेल्या अशाच ३१ मजुरांचा गुजरात येथून स्वतःच्या गावाच्या दिशेनी आज प्रवास सुरु झाला, तो खा. सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने.

कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेक मजूर, विद्यार्थी, पर्यटक देशाच्या काना कोप-यात लॉकडाऊन झाले आहेत.. रोजगार गेल्यामुळे चिंतेत असलेला मजूर वर्ग पायपीट करून आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. हे अनेकांच्या जीवरही बेतताना. दिसते. अशातच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही कामगार गुजरात मधील कच्छ येथे अडकून पडले होते. त्या मजुरांपैकी नितेश कोरे याने खा. सुनिल मेंढे यांच्याशी संपर्क साधून गावी परत येण्याची इच्छा व्यक्त करीत मदत मागितली. खा. सुनिल मेंढे तात्काळ हालचाली करीत त्यांच्या येण्याची व्यवस्था करून दिली आणि अखेर आज ९ मे च्या दुपारी हे सर्व ३१ मजूर गुजरात येथून गाडी क्र. सीजे ०१ बीव्ही ८८२२ ने स्वगृही परत येण्यासाठी निघाले. आता लवकरच आपले घर नजरेस पडणार या आनंदाने सगळया मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. त्या सर्व मजुरांनी खा. सुनिल मेंढे यांचे आभार मानले.