आमगाव,दि.10 : आमगाव तालुक्यातील आसोली गावातील धोंडूजी बाबूलाल हरिनखेडे पोलीस पाटील यांच्या घराला शनिवारच्या पहाटे आग लागल्यामुळे नऊ लाखाचा नुकसान झाल्याचे सांगितले गेले आहे.
आसोली येथील पोलीस पाटील धोंडूजी हरिनखेडे यांचे मोठे कुटुंब असून त्याचे मुले मेघनाथ हरिनखेडे, राधेश्याम हरिनखेडे, घनश्याम हरिनखेडे हे मुलाबाळांच्या सह रात्री झोपी गेल्यानंतर ९ मे च्या पहाटे २.३० च्या सुमारास त्यांच्या घराला आग लागून घरातील १ लाख २० हजार रुपये व २ लाखाचे सोन्याचे दागिने व घरातील साहित्य, ३ गोठे व राहते घर जळून खाक झाले आहेत. रात्रीला अचानक लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची गाडी पोहचेपर्यंत सर्व जळून खाक झालं होतं . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . सकाळी तलाठी यांनी पंचनामा करून धोंडूजी हरिनखेडे यांचा ९ लाखाचा नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.





