31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता शहरात आलेल्या काळविटाचा दुर्देवी मृत्यू

शहरात आलेल्या काळविटाचा दुर्देवी मृत्यू

0
282
गोंदिया,दि.10- लॉकडाऊनमुळे जंगलव्याप्त परिसरात मानवी हस्तक्षेप सध्याच्या घडीला कमी झाल्यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करायला मिळाले आहे.मात्र मुक्तसंचार करतांना आता वन्यप्राणी शहरीवस्तीकडे येऊ लागल्याचे चित्र समोर आले आहे.आज  रविवारला सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास शहरातील गणेश नगर परिसरात असेच चित्र बघावयास मिळले.अचानकपणे आलेला एका काळवीट रस्त्यावर मुक्तसंचार करीत असतांनाच काही हौशीलोकांनी त्या काळवीटाला सैरावैर केल्याने शहरातील रस्त्यावर त्या काळवीटाला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली.दरम्यान काळवीटाच्या मृत्यूची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत.त्या मृत काळवीटाला कुडवा येथील पशुसंर्वधंन रुग्णालयात नेले.शहरातील गणेशनगर या परिसरात काळवीट धावताना नागरिकांना दिसल्याने काहींनी त्याचे छायाचित्र घेण्यासाठी पाठलाग केल्याने काळविटाला धावताना अंदाज न आल्याने ते एका भिंतीवर जाऊन आदळल्याने दुखापत होऊन मृत्यू झाला.लॉकडाऊन मुळे रस्त्यांवर मानवी वर्दळ कमी झाल्यामुळे हे काळवीट शहराचा दिशेने आल्याचा अंदाज वन्यजीवप्रेमींनी लावला आहे.