29.6 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ अंबागड येथील मनरेगाच्या कामावरील मजुरांवर मधमाशांच्या हल्ला,7 जखमी

अंबागड येथील मनरेगाच्या कामावरील मजुरांवर मधमाशांच्या हल्ला,7 जखमी

0
422

तुमसर,दि.10ःतालुक्यातील ग्रामपंचायत अंबागडच्यावतीने सुरु असलेल्या मनरेगाच्या ढेकल मडावी ते शेषराव कावळे यांच्या शेतादरम्याच्या पांदन रस्ता  कामावरील मजुरांवर मधमाशांनी केलेल्या आक्रमणाच सात महिला जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी सुभाषचंद्रबोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे भरती करण्यात आले आहे.जखमी महिलामध्ये ममता भिवगडे,कला ठाकरे,विना भुतांगे,ललिता ठाकरे,अनिता गजभिये,अनुसया मुळे,शालु बावनकर व अनिता रासुलकर यांचा जखमीमध्ये समावेश आहे.या घटनेची माहिती होताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धीरज पाटील,भाजपा जिल्हा महामंत्री तथा पंचायत समिती सदस्य मुन्नाभाऊ पुंडे,ए.पी.ओ. मंगेश कोटांगले व अन्य पंचायत समिती कर्मचार्यांनी रुग्णालयाकडे धाव घेत जखमींची विचारपूस केली.