गोंदिया दि.१० (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीपासून विदेशातून प्रवास करून २५१ प्रवाशी जिल्ह्यात आले.या प्रवाश्यांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आल्यात.या सर्वांना घरीच अलगीकरण करून ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचा अलगिकरणाचा कालावधी संपला आहे.आरोग्य विभागाची चमू त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.त्यातच गेल्या ३० दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२८ व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी ३०९ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये ३०८ नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे तर १ नमुना यापूर्वीच सकारात्मक आढळून आला.यामध्ये छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथे पाॅझिटिव्ह आढळलेल्या गोंदियाच्या युवकाच्या नातेवाईंकासह त्याच्या गावातील 29 जणांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तर १६ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी आज १० मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.एकूण १९ स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.
२६ मार्चला एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला.त्या रुग्णावर उपचार करून त्याच्या घशातील स्त्रावाचा चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी नकारात्मक आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.आज ३० दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही.
सहा शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात जिल्ह्यात ४८ व्यक्ती उपचार घेत आहेत. नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमधील विलगिकरण कक्षात ६१ व्यक्ती भर्ती आहे. शासकीय संस्थात्मक अलगिकरण केंद्र असलेल्या एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज,कुडवा गोंदिया – १७, चांदोरी – ७ ,लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा – ४ ,समाज कल्याण निवासी शाळा,डव्वा – २ ,शासकीय आश्रमशाळा इळदा – १३ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण ४८ व्यक्तीं उपचार घेत आहे.
कोरोना विषाणूबाबत जिल्ह्यातील नागरिकांना काही माहिती किंवा सल्ला पाहिजे असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.





