25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

0
183

तुमसर,दि.12ः तालुक्यातील पवनारखारी (गोबरवाही) येथील तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही ११ मे रोजी सकाळी १0.३0 वाजता दरम्यान घडली. विशाल ग्यानीराम शेंडे (१४) व खुशाल ग्यानीराम शेंडे (१६) रा. पवनारखारी अशी मृत भावांची नावे आहेत.blank
जंगलव्याप्त भागात असलेल्या पवनारखारी येथील शेतशिवारात विशाल आणि खुशाल हे घरच्या गायी- म्हशी दररोज चराईसाठी नेत असत. सोमवारी सकाळी १0.३0 वाजता दरम्यान गायी -म्हशींना तलावात पाणी पाजण्यासाठी नेले असता तलावातून पाणी पाजून गायी -म्हशींना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तलावात पाय घसरून दोघांचाही मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत खोल तलावाच्या पाण्यात बुडालेल्या दोन भावांना बाहेर काढून त्यांना गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.