25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय पैसे घेणाèया पोलिसांवर कारवाई तर चोरी करणाèया रेतीतस्करावर का नाही?

पैसे घेणाèया पोलिसांवर कारवाई तर चोरी करणाèया रेतीतस्करावर का नाही?

जिल्ह्यातील ते वजनदार नेते महसुल बुडविणाèया रेती चोरावर कारवाईचे आदेश देणार काय?

0
316

साकोली(राकेश भाष्कर)दि.१२ः तालुक्यातील महालगाव रेती घाटावर एका रेती तस्कराकडून तीन लोकांनी तीस हजार रुपये घेतले.प्रकरण अंगलट येणार कळताच त्या तिघांनी घेतलेले तीस हजार निलज येथील टड्ढॅक्टर मालक गहाणेला परत केले.रेती तस्करीमध्ये असलेल्या या ट्रक्टरमालकाने जिल्ह्यातील वजनदार असलेल्या नेत्यालाच आपल्याकडून पोलिसांनी पैसे घेतल्याचे सांगून टाकले.त्या वजनदार नेत्यांनेही लगेच पोलीस अधिक्षकांचे कान टोचले आणि त्या तिघापैकी एकाला निलqबत करुन टाकले.मात्र या प्रकरणात ज्यांने रेती चोरली तो चोर मात्र तालुक्यात इमानदार ठरल्याची चर्चा सुरु झाल्याने त्या वजनदार नेत्यांने किमान आपल्या पदाची गरिमा बघत अशा रेती चोरावंरही कारवाई का केली नाही,अशा सुर उमटू लागला आहे.३० हजार पोलिसांना दिले सांगणाèया त्या रेती तस्कराने महसुल विभागाचा मात्र ९० हजाराचा महसुल बुडविला त्याचे काय?हे सर्व झाल्यानंतर निलqबत पोलीस कर्मचाèयाची चौकशी सुरु झाली आहे.मात्र ज्या गहाणे नामक रेती चोराने नेत्याकडे तक्रार केली त्यानेच पोलिसांच्या चौकशीत मात्र आपण कुणालाही पैसे दिले नसल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे.जर या रेती चोराने पैसेच दिले नव्हते तर त्या नेत्याकडे तक्रार करायची गरज का पडली अशाही प्रश्न आता समोर आला आहे.
यात ज्या ट्रक्टरमालकाकडून अवैध रेती वाहतुकीच्या नावावर ज्या पोलिसांनी पैसे घेतले,त्यांनी कुणाच्या आशिर्वादाने घेतले. मग पैसे घेतले तर पोलीस ठाण्याला का माहिती दिली नाही.मग घेतलेले पैसे का परत केले या सर्व प्रकरणामुळे त्या तीन पोलिसांवर कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका विभागाने ठेवला असेल यात शंकाच नाही.परंतु जो व्यक्ती विनारॉयल्टी रेतीची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवत असेल आणि सध्याच्या परिस्थितीत राज्याची आर्थिक स्थिती ही संकटात असताना अशा रेती चोरांना मात्तबर नेत्यांने पाठबळ देणे हे सुध्दा अयोग्यच म्हणावे लागेल.रेती चोराकडून पैसे घेतल्याप्रकरणी जर त्या पोलिसांवर कारवाई होऊ शकते तर त्या रेती चोरावर का नाही अशा प्रश्न जनमानसात चर्चेला जाऊ लागला आहे.त्यामुळे त्या नेत्याने त्या पोलिसांसोबतच शासनाचा महसुल बुडविणाèया त्या रेती चोरावर तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश दिल्यास त्या नेत्याबद्दल जो संदेश चोरांना वाचविल्याबद्दल जात आहे,त्यावर कुठे तरी पुर्णविराम लागेल यात शंका नाही.