24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News वाळूमाफियांचा पवनी तहसिलदारासंह मंडळ अधिकारी व तलाठ्यावर जिवघेणा हल्ला

वाळूमाफियांचा पवनी तहसिलदारासंह मंडळ अधिकारी व तलाठ्यावर जिवघेणा हल्ला

0
957
फाईल फोटो

भंडारा/गोंदिया,दि.12ः- जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वाळू माफियाकडून पवनी तहसिलदारासंह मंडळ अधिकारी व तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदरील घटना आज मंगळवारी (दि.१2) पहाटे पाच वाजेच्या सुमारास निलज व भिवापूरजवळील मरु नदीवरील पुलावर घडली. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली असून त्यामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वाळू वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढतच असून सर्वसामान्यांवर त्यांची दादागिरी करण्याची वृत्ती बळावली आहे.नागपूरातील गुंडप्रवृत्तीच्या या वाळूमाफियांना स्थानिक जिल्ह्यातील काही राजकारणातील पांढरपेश्यालोंकाचेही पाठबळ असल्यानेच वाळूमाफिये अधिकारी व कर्मचार्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सविस्तर असे की पवनी तालुक्यातील बंद पडलेल्या गुडेगाव वाळू घाटावरून अवैधरित्या वाळूची उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार गजानन कोकुर्डे यांना प्राप्त होताच  आपल्या Mh 32-Ah 7308 या पांढर्या रंगाच्या स्कोडा गाडीने नीलज येथे पोचले.तिथे आधीच पोचलेले मंडळ अधिकारी कावटे व तलाठी पाटिल हे आल्टो कारने पोचले होते.दरम्यान नीलज येथून ट्रक क्रमांक MH40BC8674, MH49AT8675 ने भिवापूरकडे वाळू नेत असल्याचे दिसताच या दोन्ही ट्रकला तहसिलदार कोकुर्डे यांनी थांबवले.तेवढ्यातच ट्रक मालक नागपूर(खरबी)निवासी निजामुल खान उर्फ कल्लू खान,रब्बुल खान,कलाम खान,फिरोज खान आणि डब्लू खान तिथे पोचले आणि ट्रक सोडण्यासाठी तहसिलदारावर दबावतंत्र वापरुन दादागिरी करु लागले.परंतु तहसिलदारांनी त्यांचे न एैकता तलाठी व मंडळ अधिकार्याला ट्रकवर बसवून दोन्ही ट्रक तहसिल कार्यालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले.तेव्हा वाळूमाफियांनी तलाठ्याला मारहाण केली तर कलाम खान या इसमाने दगडाने तलाठ्याच्या डोक्यावर मारण्याचा तसेच ट्रक खाली पाडून दोन्ही ट्रक घटनास्थळावरुन पडवून नेले.वाळूमाफिया ट्रक पळवून नेत असल्याचे तहसिलदार कोकुर्डे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या स्कोडा कार क्रमांक mh32ah7308वाहनाने पाठलाग केला.आणि भिवापूर पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या मरु नदीवरील पुलावर आपले वाहन समोर उभे केले असता तहसिलदाराला गाडीजवळून दुर होण्याची धमकी देत तहसिलदाराच्या गाडीवर ट्रक चढविण्याचा प्रयत्न करीत कारला ठोकर मारत ट्रक पळवून नेले.यामध्ये तहसिलदारांची कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले,या घटनेत तहसिलदार कोकर्डे व मंडळअधिकारी कावटे हे मात्र बालबाल बचावले.त्यानंतर पवनी तहसिलदार कोकुर्डे यांनी भिवापूर पोलीस ठाणे गाठले.तिथे पोलिस निरिक्षक भोर्डेकर यांनी सदर प्रकरणात जिरो एफआयआर दाखल करीत पवनी पोलीस ठाण्यास पाठविले.

याप्रकरणातील आरोपी इनाजुल खान उर्फ कल्लू खान,रब्बूल खान यांनी यापुर्वीही नागपूरातील नंदनवन पोलीस ठाणेंतर्गत कार्यरत महिला तहसिलदाराच्या अंगावर खरबी येथे वाहन चढविण्याचा प्रयत्न केला होता.त्याप्रकरणातही उच्च न्यायालय नागपुर खंडपीठाने सुमोटो घेत नंदनवन पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले होते.त्या प्रकरणात आजही 2 ट्रक नंदनवन पोलिसांच्या ताब्यात आहेत.या वाळूमाफियांवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून वाळू वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी वाढतच असून सर्वसामान्यांवर त्यांची दादागिरी करण्याची वृत्ती बळावली आहे

महसूल यंत्रणा करोनाच्या पार्श्वभूमीवर कामात गुंतल्याचा फायदा घेत रॉयल्टी चोरांनी माती, दगड, रेती, खडी आदी गौणखनिजाची विना रॉयल्टी वाहतूक करून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाची हानी केल्याचे प्रकार समोर आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक भागात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे तस्कर वाळूचा बेसुमार उपसा करत असतात.गोंदियात तर काही गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांनी राजकीय नेते म्हणवून घेणार्यांशी हातमिळवणी करीत वाळू तस्करी सुरु केली आहे. ही वाळू तस्करी रोखण्यासाठी धडाडीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरच असा हल्ला झाल्याने सध्या महसूल प्रशासनात भितीचे वातावरण पसरले आहे