24.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ३२ दिवसानंतरही गोंदिया ग्रीनच;८ अहवालाची प्रतीक्षा

३२ दिवसानंतरही गोंदिया ग्रीनच;८ अहवालाची प्रतीक्षा

३२७ चाचणी अहवाल नकारात्मक

0
1009

गोंदिया दि.१२(जिमाका) कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीपासून विदेशातून प्रवास करून २५१ प्रवाशी जिल्ह्यात आले.या प्रवाश्यांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आल्यात.या सर्वांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. सर्वांचा अलगिकरणाचा कालावधी संपला असला तरी त्यांना अलगीकरणातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असून आरोग्य विभागाची चमू त्यांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. आज ३२ दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.

जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.काही व्यक्ती घरी तर काही व्यक्तींना शासकीय संस्थांत्मक अलगीकरण तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नियमित नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३६ व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी ३२८ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये ३२७ नमुन्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक आला असून १ नमुना यापूर्वीच सकारात्मक आला आहे .

८ व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी आज १२ मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.एकूण ८ नमुन्यांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात एक रुग्ण २६ मार्चला कोरोना बाधित आढळून आला होता.त्या रुग्णावर उपचार करण्यात आले. त्याचा चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी नकारात्मक आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज ३२ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला नाही.

सहा शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात जिल्ह्यात ६३ व्यक्ती उपचार घेत आहेत.नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमधील विलगिकरण कक्षात ६० व्यक्ती उपचार घेत आहे.

शासकीय संस्थात्मक अलगिकरण केंद्र असलेल्या एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज,कुडवा गोंदिया – १७, चांदोरी- ५,लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा – ४ ,उपकेंद्र बिरसी – ७ ,समाज कल्याण निवासी शाळा,डव्वा – २ आणि शासकीय आश्रमशाळा इळदा – २८ असे एकूण ६३ व्यक्तीं उपचार घेत आहे.विलगिकरण केंद्रातील ६० आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रातील ६३ असे एकूण १२३ जण उपचार घेत आहे.

कोरोना विषाणूबाबत जिल्ह्यातील नागरिकांना काही माहिती किंवा सल्ला पाहिजे असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.