26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home राजकीय गोंदिया जिल्हा दुग्धसंघावर प्रशासक नेमा

गोंदिया जिल्हा दुग्धसंघावर प्रशासक नेमा

0
139

गोंदिया,दि.१२-गोंदिया जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकèयांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला गोंदिया जिल्हा दुग्ध संघ हा आपला मुळ उद्देश साध्य करण्यात अपयशी राहिला आहे.त्यातच गेल्या १५ वर्षाच्या कार्यकाळात संघाची आर्थिकपरिस्थिती डबघाईस आली असून दुध उत्पादकांचे कोट्यवधीचे देयके संघाकडे प्रलqबत आहेत.ते देयके देण्याची सध्याची परिस्थिती संघाची नसल्याने संघावर तत्काळ प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी जिल्हा दुग्धसंघाचे माजी संचालक व शिवसेना नेता पंकज यादव यांनी केली आहे.यादव यांनी राज्याचे
पशुसंवर्धन व दुग्ध विकास तथा क्रीडा एवं युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची गोंदिया येथे भेट घेऊन यांसदर्भातील निवेदन सादर केले.निवेदनात मागील ५ वर्षाचा ऑडिट शासकीय स्तरावर करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.