26.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ 13 मे रोजी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर

13 मे रोजी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

0
126

गोंदिया दि.12 (जिमाका) गोंदिया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २५ मध्ये असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील सभागृहात १३ मे रोजी दुपारी १ ते दुपारी ४ वाजतापर्यंत प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे.या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येकाची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. कोरोना संसर्गापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.या शिबिरामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींची थर्मल स्कॅनिंग, नाडीचे ठोके,आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार आहे.आवश्यकता असल्यास प्रतिबंधात्मक औषधे मोफत देण्यात येणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिरात गोंदीया होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ हर्षा कानतोडे,डॉ रोशन कानतोडे,डॉ. सुषमा गौपाले,डॉ. सपना पटले, डॉ.ग्रुरुप्रीत कौर,डॉ. ललित रहांगडाले,डॉ. आकांक्षा अग्रवाल,डॉ.साक्षी तिवारी तसेच डॉ. नेहल,डॉ.रुचिता,डॉ.रिचा ह्या या प्रसारमाध्यम प्रतिनिधीची आरोग्य तपासणी करणार आहे. जास्तीत जास्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या वेळेत आपली आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.