25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे- खा.सुनील मेंढे

कोरोना मुक्तीच्या लढयात परिचारिकांचे योगदान महत्वाचे- खा.सुनील मेंढे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

0
64

गोंदिया दि.13  : कोरोना मुक्तीच्या लढयात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्करुन चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्व परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे गौरवोदगार खा.सुनील फुंडे यांनी १२ मे रोजी काढले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.मेंढे बोलत होते. यावेळी त्यांनी प्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर, डॉ.देशमुख, दीपक कदम, गजेंद्र फुंडे, मेट्रन अनु नांदने, डॉ.तिवारी, अधिसेविका दीप्ती साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अधिसेविका दीप्ती साळवे यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली.     अधिष्ठाता डॉ.रुखमोडे जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले,  रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबळात सुध्दा दिवसरात्र तत्परतेने चांगली सेवा असल्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा  उंचावत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढयात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहे.

परिचारिकांनी  त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकेबरोबरच परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असतांना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू  रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढयातील परिचारक बंधू आणि भगिणींचे हे योगदान कोणीही विसरु शकरणार नाही, असेही डॉ.रुखमोडे म्हणाले.

खा. मेंढे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक आहे. सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढयात  त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेला मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनीही सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.कोरोना बाधितांवर उपचार करतांना संरक्षणात्मक म्हणून घालण्यासाठी ३०० पीपीई किट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गेडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.योगेश पटले यांनी मानले.

कार्यक्रमानंतर खा.सुनील मेंढे यांनी  रुग्णालयात कोरोना कोविड डेडीकेटेड सेंटरला भेट देवून पाहणी केली.  कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा  बैठकीतून घेतला व आवश्यक त्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका उपस्थित होत्या.