31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे गावाबाहेरील शाळेत विलगीकरण करा

जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे गावाबाहेरील शाळेत विलगीकरण करा

नवेगावबांध ग्रामस्थांची मागणी

0
407

नवेगावबांध दिं.14.कोरोना ग्रस्तांचा तीन हजाराचा टप्पा ओलांडणाऱ्या पुणे,त्रिशक पूर्ण करणाऱ्या नागपूर सारख्या रेड झोनमधून तसेच इतर जिल्ह्यातून व राज्यातून नवेगाव बांध येथील काही रोजगार निमित्य, शिक्षणानिमित्त, प्रवासा निमित्य गेलेले नागरिक सरकारने जिल्हा अंतर्गत, बाहेर राज्यातून स्वगावी परतणाऱ्या नागरिकांना मुभा दिल्यामुळे,  11 मे पासून येथे परत यायला सुरुवात केली आहे. काल पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेडझोन मधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना घरीच 14 दिवस विलगीकरण करण्याचा सल्ला तलाठ्यांनी दिला. परंतु ते आजच शेतावर धानाचे भारे बांधायला गेले असल्याचे समजले. घरी 14 दिवसाचे विलगीकरण करण्याचा सल्ला देऊनही ते विलगीकरनात न राहता, कुठे कामावर, कुठे बाजारात, तर काही गावात फिरत राहतात. त्यामुळे आतापर्यंत सेफ असलेला गाव कोरोनाग्रस्त तर होणार नाही ना ?या भितीने गावकऱ्यांना पछाडले आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या रहिवाशांची 14 दिवसाचे विलगीकरण गावाबाहेर शाळेत करण्याची मागणी ग्रामवासी यांनी केली आहे. लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना काही दिवस प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे विलगीकरणात ठेवण्यात येत होते. परंतु प्रशासनाने त्यात आडकाठी आणली. बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून गावात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव होऊ नये. हाच गावकऱ्यांचा शुद्ध हेतू होता. याला कुणाचाही विरोध नव्हता. असे असतांना देखील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तर सरपंच ,ग्रामविकास अधिकाऱ्यांना एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली होती. विलगीकरणात राहणारे स्वमर्जीने राहायला तयार होते. परंतु सरकारी खाक्या दाखवून अधिकाऱ्यांनी त्यापासून गावांना परावृत्त केले. बाहेरून गावात येणारे नागरिक 14 दिवस स्वतःचे विलगीकरण शाळेत करण्यात तयार होतात. त्यामुळे गावाला ग्राम वासियांना वाटणारे भय ही वाटत नाही. इतर शेजारी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून,बाहेर राज्यातून येणाऱ्या गावकऱ्यांना गावाबाहेरील शाळा, अंगणवाड्या, वस्तीगृहात 14 दिवस विलगीकरण ठेवण्यात येते. मग ते काय कायद्याचे उल्लंघन करतात. ही अंमलबजावणी शेजारी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायदा संचारबंदी कायदा यांचे पालन करूनच गावाबाहेर बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे विलगीकरण करत आहेत. मग गोंदिया जिल्ह्यातच त्याचे वावडे काय? असा सवाल गावकरी करीत आहेत. घरी बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस विलगीकरणात राहा, घरा बाहेर फिरू नका, घरीच रहा ,असे कितीही सांगितले तरी ते फिरतातच. याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. म्हणून बाहेरून गावात येणाऱ्या नागरिकांना गावाबाहेर शाळेत विलगीकरण ठेवावे याकडे स्थानिक प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी नवेगाव बांध ग्रामस्थांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बी.ए.डी विद्यालय नवेगाव बांध व मालीनीताई एस. दहिवले आश्रमशाळा एरंडी येथे 100 खाटांचे कोविड-19 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.