25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ खाजगी व शासकीय जागेवरील वृक्षांची कत्तल करणाऱ्याला वनाधिकाऱ्याचे सरंक्षण-मेंढे यांचा पत्रपरिषदेत आरोप

खाजगी व शासकीय जागेवरील वृक्षांची कत्तल करणाऱ्याला वनाधिकाऱ्याचे सरंक्षण-मेंढे यांचा पत्रपरिषदेत आरोप

0
347

आमगाव,दि.14:– सालेकसा तालुक्याच्या गांधीटोला (सालईटोला) येथील शासकीय वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून खाजगी व शासकीय वनविभागाच्या जागेवरील वृक्षांची कत्तल केल्याची तक्रार गांधीटोला येथील भुवन मेंढे यांनी सालेकसा पोलीस स्टेशन व वनविभागाला केली. त्र संबंधित विभागाकडुन थातूरमातूर चौकशी करून संबधिताला वाचविण्याचा प्रयत्न करुन अधिकारीच संरक्षण देत असल्याचा आरोप तक्रारकर्ते भुवन मेंढे यांनी आमगाव येथे पत्रपरिषदेत केले. सालेकसा तालुक्यातील गांधीटोला (सालईटोला) येथील भुवन शंकरराव मेंढे यांची वडिलोपार्जित शेत गट क्रमांक १८५ असून याच शेताला लागून वनविभागाची जमीन गट क्रमांक १८८,१८९,१९१ आहे. भुवन मेंढे यांची शेतात सिंहना, पळस, निंब इत्यादी झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला भुवन मेंढे यांच्या शेतातील १२ सिंहनाच्या वृक्षांची कत्तल गांधीटोला येथील शामराव पाथोडे व मुलगा पवन पाथोडे, प्रकाश पाथोडे यांनी केले.एवढेच नव्हे तर लागून असलेल्या शासकीय जमिनीतील गट क्रमांक १८८,१८९,१९१ या जागेवरील सुध्दा वृक्षांची कत्तल करून घेऊन गेलेत.
या घटनेची लेखी तक्रार पोलिस स्टेशन, वनपरिक्षेत्र अधिकारी सालेकसा यांना देण्यात आली. याबाबत क्षेत्र सहायक संजय पटले यांनी १७ एप्रिल २०२० ला मौका चौकशी करून कापलेल्या झाडाचा पंचनामा केला. पंचनामा केलेल्या २५ वृक्षांच्या बल्या गैरअर्जदाराच्या घरून जप्त करण्यात आले व काही २० बल्या गैरअर्जदार च्या घरीच सोडून दिले. एवढे होऊनही मात्र वनविभागाकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भुवन मेंढे यांनी केला आहे.एवढेच नाही तर गैरअर्जदार यांनी माझ्या बटईदाराला जीवे मारण्याची धमकी दिली तरी पोलिसांनी गैरर्जदारांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही,असेही त्यांनी सांगितले.गैरअर्जदार यांनी यापूर्वी सुध्दा वनविभागाच्या जमिनीवरील २०१८ मध्ये गट क्रमांक १९१ मधील ५०० बांबूची अवैध कत्तल केली आहे व शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे तरी सुद्धा वनविभागाचे वन परीक्षेत्राधिकारी अभिजित इलमकर सालेकसा, व साकरीटोला वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी संजय पटले हे गैरर्जदारांना सह देत असल्याचेन मेंढे यांनी म्हटले आहे. जर गैरअर्जदारांवर कारवाई न झाल्यास वनविभाग कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.