25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ आरोग्य सेतुवर दाखवतेय करोना रुग्ण,जिल्हा प्रशासन म्हणतोय चुकीची माहिती

आरोग्य सेतुवर दाखवतेय करोना रुग्ण,जिल्हा प्रशासन म्हणतोय चुकीची माहिती

0
631

गोंदिया,दि.१४:कोवीड १९ चा प्रभाव रोखण्यासोबतच रुग्णाची माहिती उपलब्ध व्हावी याकरीता केंद्र सरकारने आरोग्य सेतू अप तयार केले.मात्र गेल्या ३३ दिवसात गोंदियात एकही रुग्ण नसतानाही मात्र या आरोग्य सेतू अॅपवर गोंदियापासून ४ किमी अंतरावर रुग्ण दाखवत असल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन पी.व्ही.रुखमोडेना विचारणा करीत धारेवर धरले.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रुखमोडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवहरे यांना सदर रुग्णांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर माहिती भरतांना स्वतःला पाॅझिटिव्हच्या आॅप्शनला क्लिक केल्यामुळे असे झाल्याचे सांगत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सदर सेतूमधून देण्यात येत असलेली चुकीची माहिती दुरुस्त करण्यास सुरवात केल्याचे सांगितले.त्या व्यक्तींनी सेतू डाऊनलोड केल्यानंतर माहिती भरताना पॉझिटिव्हचा आप्शन सिलेक्ट केल्याने हे रुग्ण दाखवत असून त्यात त्वरीत सुधारणा करण्यात येत असल्याचे रुखमोडे यांनी कबूल करीत शिवहरे याना सांगितले.