साकोली(राकेश भास्कर) 14 मे: हरियाणातील मानसर येथील मारुती सुझुकी कंपनीत, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काही मजूर लॉकडाऊन मुळे अडकलेले होते. हरियाणा येथून नागपूर पर्यंत ट्रेन ने व नागपूर ते भंडारा, गोंदिया बसने प्रवास करून 22 जण स्वगृही स्वतःच्या खर्चाने पोहचले.विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातीलसर्वच पक्षीय नेत्यामध्ये मीच या विद्यार्थ्यांना,कामगारांना आणल्याचे सांगण्याची सध्या एकच चुरस लागलेली असतांना मात्र हरियाणावरुन यांना स्वखर्चाने यावे लागले.
अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाता यावे म्हणून रेल्वेने विशेष ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसंघाणे हरियाणा येथील अडकलेल्या भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील काही मजूर 12 मेच्या रात्री 9 वाजता हरियाणातून नागपूर करीता रवाना झाले. त्याकरिता प्रत्येक मजुरांना 1620 रुपये रेल्वे ची तिकीट आकारण्यात आले. 13 मे रोजी नागपूर येथे सकाळी 11 वाजता पोहचल्यानंतर नागपूर रेलवे स्टेशनवर दोन स्टार बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसेस पैकी एका बसने प्रवाश्याना नागपूरच्या बसस्थानकात सोडण्यात आले. प्रवासी जास्त आणि बस एकच असल्यामुळे काहींना पायीच बस स्थानकापर्यंत जावे लागले. भंडारा गोंदिया करीता बस लागली परंतु 22 प्रवाशी जमेस्तोवर बस सुटणार नव्हती. आलेल्या प्रवाश्यांचे मेडिकल चेकअप बस स्थानकातच उपस्थित असलेल्या काही डॉक्टरांनी केले. जेवणाची सोय बसस्थानकात करण्यात आली होती.बसस्थानकावर आलेल्या परराज्यातील प्रवाशांची यादी तयार करुन ती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आली.22 प्रवाशी जमण्यास व जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळण्यात तब्बल सहा तास नागपूरच्या बसस्थानकावर निघून गेले.त्यानंतर कुठे सायंकाळी 6 वाजता भंडारा येथील 2, साकोली येथील 2 व गोंदिया जिल्ह्यातील 19 असे 23 प्रवाशी घेऊन बस निघाली ती रात्री उशिरापर्यंत भंडारा येथे पोचली.त्यानंतर सगळ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे भारत सरकारने घोषणा करूनही प्रवाश्यांकडून रेल्वेभाडा आकारण्यात आला, त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारने मोफत बस सेवा पुरवली.





