30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ लग्नास 20 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नाही

लग्नास 20 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती नाही

लग्न समारंभासाठी कार्यप्रणाली निश्चित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित Ø वर-वधु व नातेवाईकांच्या निजी जागेत लग्न समारंभ

0
272

blank

भंडारा, (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत लग्नसमारंभाच्या परवानगीबाबत विचारणा होत असून याअनुषंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत लग्न समारंभासाठी प्रमाणित कार्यप्रणाली जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी आदेशाद्वारे 13 मे रोजी निश्चित केली आहे.

भंडारा जिल्ह्यात सर्व जाती-धर्माच्या लग्न समारंभास सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील नमूद अधिसूचना व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना विचारात घेता लग्न समारंभाच्या ठिकाणी 20 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत. लग्नाच्या ठिकाणी सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे, हॅन्डवॉश, सॅनिटायजर्सचा वापर करणे, सर्व वस्तू , ठिकाणे लग्नाचा विधी संपल्यानंतर निर्जतूकीकरण करणे गरजेचे आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली प्रमाणित कार्यप्रणाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील नमूद अटी व शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक आहे. या अटीवर भंडारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत वर-वधुच्या निजी निवासस्थानी किंवा संबंधिताचे नातेवाईक यांच्या निजी जागेतच लग्न समारंभास मुभा देण्यात आली आहे.

            लग्न समारंभाच्या अनुषंगाने लग्नाचा दिनांक, स्थळ, वेळ इत्यादी बाबत पूर्व माहिती संबंधितांनी लगतच्या पोलीस स्टेशन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक आहे. या आदेशाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित पोलीस  निरीक्षक यांनी अंमलबजावणीची वेळोवेळी खात्री करावी. तसेच जे कोणी व्यक्ती, समुह या आदेशाचे उल्लंघन करील त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी आदेशात नमूद केले आहे.

blank