26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता वैनगंगेत उडी घेवून आरोग्य कर्मचा-याची आत्महत्या

वैनगंगेत उडी घेवून आरोग्य कर्मचा-याची आत्महत्या

0
591

भंडारा,दि.15  :भंडारा नगरपरिषदेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याने वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१४ मे० रोजी उघडकीस आली. सागर रामदास कटकवार असे मृतक कर्मचार्याचे नाव आहे.
मृतक सागर रामदास कटकवार हा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असून त्याचे वय अंदाजे ४५ वर्षे होते. हा कर्मचारी आजाराने त्रस्त असून आजाराला वंâटाळून त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष खा.सुनील मेंढे व नगरसेवक आशु गोंडाने, तहसिलदार अक्षय पोयाम, पोलीस निरिक्षक कानसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. व सदर घटनेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमु व पोलीस पथकाचे शोधकार्य सुरू असून पे्रत अद्याप सापडले नाही. या मृतक व्यक्तीच्या मागे पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे.